Student Enrolled
District Reached
Products
Schools Reached
इ. १ ली. ते इ. ७ वी. साठी पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी व सेमी इंग्रजी माध्यमासाठी जून ते मार्च अखेर दरमहा एक या प्रमाणे वर्षामध्ये एकूण १० अंक प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र प्रसिद्ध होतात.
इ. १ ली. ते इ. ४ थी. साठी पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आधारित सरावासाठी मराठी माध्यमासाठी सर्व विषयांच्या सर्व घटकांवर आधारित विविध नाविन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्पांचा समावेश असणारी रचनात्मक स्वाध्याय पुस्तिका.
इ. १ ली. ते इ. ४ थी. साठी पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आधारित सरावासाठी सेमी इंग्रजी माध्यमासाठी सर्व विषयांच्या सर्व घटकांवर आधारित विविध नाविन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्पांचा समावेश असणारी रचनात्मक स्वाध्याय पुस्तिका.
इ. १ ली. ते इ. ४ थी. साठी अभिरुप शिष्यवृत्ती, शासकीय शिष्यवृत्ती तसेच इतर सर्व स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी सर्व घटकांची माहिती, नमुना व सराव प्रश्न, स्पष्टीकरणासह उत्तरसूची असणारी मराठी व इंग्रजी माध्यमासाठीची स्वतंत्र परिपूर्ण मार्गदर्शिका.
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी इ. १ ली ते इ. ८ वी या प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र, प्रत्येक महिन्याला १ याप्रमाणे जुलै ते फेब्रुवारी अखेर एकूण ८ मासिक प्रश्नपत्रिका सराव संच प्रसिद्ध होतात.
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी इ. ५ वी. व इ. ८ वी. या इयत्तेसाठी स्वतंत्र, प्रत्येक २ महिन्याला १ या प्रमाणे जुलै ते फेब्रुवारी अखेर एकूण ४ द्विमासिक प्रश्नपत्रिका सराव संच प्रसिद्ध होतात.
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी फक्त इ. ५ वी. साठी प्रत्येक पंधरवड्याला १ याप्रमाणे जुलै ते फेब्रुवारी अखेर या ८ महिन्यांसाठी एकूण १६ पंधरवडा प्रश्नपत्रिका सराव संच प्रसिद्ध होतात.
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी इ. ४ थी./इ. ५ वी. व इ. ७ वी./इ. ८ वी. या इयत्तांसाठी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मुख्य परिक्षेचा अचुक अंदाज घेणारे एकूण ४ विशेष सराव संच प्रसिद्ध होतात.
इ. ५ वी. च्या शासकीय शिष्यवृत्ती परिक्षेतील इंग्रजी विषयातील सर्व घटक, उपघटकांची सखोल माहिती व त्यावर आधारित सराव प्रश्न व शेवटी सोडविण्यासाठी सर्व चाचण्या इ. समावेश असणारी इंग्रजी विषयाच्या तयारीसाठीची परिपूर्ण मार्गदर्शिका.
शासकीय शिष्यवृत्ती, अभिरुप व इतर सर्व स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी एकूण १० प्रश्नपत्रिकांचा समावेश असणारी इ. १ ली ते इ. ८ वी या प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र स्पष्टीकरणासह उत्तर सूची असणारी सराव प्रश्नपत्रिका संच पुस्तिका.
इ. ८ वी. साठी होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेचा (NMMS) संपूर्ण तयारीसाठी मुख्य परिक्षेचा अचुक वेध घेणाऱ्या प्रश्नांचा समावेश असणारे एकूण ६ विशेष सराव संच प्रसिद्ध केले जातात.
इ. ५ वी. तील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परिक्षेच्या तयारीसाठी तज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेल्या एकूण १५ प्रश्नपत्रिकांचा समावेश असणारी दर्जेदार सराव प्रश्नपत्रिका संच पुस्तिका.
इ. ७ वी साठी रयत शिक्षण संस्थेद्वारे घेण्यात येणार्या रयत प्रज्ञाशोध परिक्षेच्या (RTS) तयारीसाठी जुलै ते फेब्रुवारी असे एकूण ८ मासिक सराव संच व संपूर्ण अभ्यासक्रमावर एकूण ४ विशेष सराव संच प्रसिद्ध केले जातात.
इ. १ ली. ते इ. ४ थी. साठी सर्व विषयांसाठी रंजक व्यवसाय, गाणी, गप्पा, गोष्टी व खेळ इत्यादी समावेश असणारा गणितीय सापशिडीच्या बहुरंगी मुखपृष्ठासह सर्व पाने रंगीत असणारा दिवाळी अभ्यास.
उन्हाळी सुट्टीचा आनंद हसत-खेळत अभ्यासाद्वारे लुटण्यासाठी इ. १ ली. ते इ. ४ थी. च्या विद्यार्थ्यांची सृजनशीलता, स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती यांच्या विकासास संधी देणाऱ्या उपक्रमाचे मांडणी असणारा व गत इयत्तेची उजळणी व नवीन इयत्तेची पूर्वतयारी करण्यासाठी.
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा अभिरूप व इतर सर्व स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी इ.१ ली. ते इ.८ वी.साठी प्रकाशनाद्वारे मोबाईलॲपद्वारे देखील सराव संच उपलब्ध करून दिले आहेत.येथे लगेच निकाल पहावयास मिळत असून चुकलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील पाहता येते.
विविध स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी इ. ३ री. व इ. ४ थी. च्या परिसर अभ्यास या विषयाच्या संपूर्ण तयारीसाठी २००० वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असणाऱ्या विविध प्रश्नपेढ्या.
मुलांना आवडणाऱ्या विविध कृती, शब्दकोडी, खेळ, चित्रातील गंमती जंमती, चित्ररेखाटन व रंगभरण इ. नाविन्यपूर्ण ५०० पेक्षा जास्त हसत-खेळत ॲक्टिव्हीटींचा समावेश असणारी इ. १ ली. ते इ. ४ थी. साठी ची पुस्तिका.
इ. १ ली. ते इ. ७ वी. च्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी लहान वयापासूनच हस्ताक्षर सुंदर व शुद्ध होण्यासाठी विविध उपक्रमाची मांडणी केलेली मार्गदर्शिका.